UN-Habitat organizes World Urban Forum 9 (WUF9) to scale up & localize Implementation of the New Urban Agenda (NUA)

The ninth session of the World Urban Forum (WUF9) was convened by UN-Habitat during 7-13 February 2018 at Kuala Lumpur, Malaysia. Focus of the forum was to localize and scale up the New Urban Agenda (NUA). In principle, implementation of NUA is important for India. However, how far will NUA be applicable to Indian circumstances is yet to be assessed. 

मराठी वृत्तांत – जागतिक नागरी मंच ९, ७ ते १३ फेब्रुवारी २०१८, क्वालालुंपूर, मलेशिया| सर्वसमावेशक शहरे, २०३० : नवीन नागरी धोरणाची अंमल बजावणी

'जागतिक नागरी मंच ९ (World Urban Forum 9)' परिषद ७ ते १३ फेब्रुवारी, २०१८ दरम्यान मलेशियाच्या क्वालालुंपूर येथे संपन्न झाली. वेगाने वाढणारी शहरे आणि नागरीकरणाचे समाज, अर्थकारण व पर्यावरणावर होणारे परिणाम हा एकविसाव्यां शतकातील ज्वलंत विषय आहे. ‘जागतिक नागरी मंच’ ही द्विवार्षिक परिषद ह्या विषयावर सांगोपांग चर्चा करण्याचे संयुक्त राष्ट्रसंघाचे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. नवव्या जागतिक नागरी मंच परिषदेचा विषय  "सर्वसमावेशक शहरे, २०३० : नवीन नागरी धोरणाची अंमल बजावणी " हा होता.