सूर्यच करेल भविष्यात भारताला ऊर्जेचा पुरवठा, भारत व फ्रान्स यांनी ११ मार्च २०१८ रोजी दिल्ली येथे केले पहिल्या ‘आंतरराष्ट्रीय सौर-ऊर्जा गठबंधन’ परिषदेचे आयोजन.

भारत आणि फ्रान्स यांनी ११ मार्च २०१८ रोजी दिल्ली येथे पहिले आंतरराष्ट्रीय सौर-ऊर्जा गठबंधन (International Solar Alliance) परिषदेचे आयोजन केले होते. आंतरराष्ट्रीय सौर-ऊर्जा गठबंधन हे कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्यामध्ये असलेल्या राष्ट्रांचा गट आहे. आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा गठबंधन स्थापन करून भारताने पुन्हा एकदा आपण बहुराष्ट्रीय संस्थात्मक विदेशनीतिचा पुरस्कर्ता असल्याचे अधोरेखित केले आहे.